ऑनलाईन टीम / भुवनेश्वर :
ओडिशा सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता कोविड टेस्टसाठी 100 रुपये दर निश्चित केला आहे. राज्यातील प्रत्येक खाजगी लॅबमध्ये आता 100 रुपयांमध्ये रैपिड एंटीजन टेस्ट केली जाणार आहे. कोविड 19 टेस्टचे हे दर देशातील सर्वात कमी दर आहेत.
दरम्यान, ओडिशामध्ये काल 363 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 3, 26, 596 वर पोहोचली आहे. तर काल झालेल्या तीन लोकांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या 1,839 झाली आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 30 जिल्ह्यांमधील 27 मध्ये हे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वात जास्त 50 रुग्ण हे खुर्द जिल्ह्यात, 35 सुंदरगडमधील आहेत. सध्या राज्यात अजूनही 3,057 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 3 लाख 21 हजार 647 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.









