महिंद्रा, ओला व एमजी यासह अन्य वाहन खरेदी घर बसल्या
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्याचे जग हे डिजिटलच्या वातावरणात विस्तारत आहे. यामध्ये प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाने प्रवेश केला आहे. यामध्ये वाहनधारकांचा कल हा ऑनलाईन स्वरुपात वाहने बुकिंग करण्याकडे राहणार असल्याचे संकेत निर्माण होत आहेत. हा ट्रेंड कोविड19च्या संकटानंतर मोठय़ा प्रमाणात बदलत आहे. वाहन क्षेत्रातील कंपन्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन आपल्या उत्पादनांच्या बुकिंगसाठी ऑफलाईनसोबत ऑनलाईन बुकिंगचा पर्यायही सुरु केला आहे.
निवडक कंपन्यांची स्थिती
ओला स्कूटर
ओला कंपनीने बाजारात ई-स्कूटर बाजारात आणली आहे. परंतु कंपनीने देशात एकही प्रत्यक्ष स्टोअर उभारले नाही. याच्या व्यतिरिक्त कंपनीने वेबसाईटवर रिझर्वेशन विंडोमध्ये ओला इलेक्ट्रिक स्कूटरसाठी मोठय़ा प्रमाणात ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दिली आहे. यात 24 तासांमध्ये तब्बल 1 लाखपेक्षा अधिकचे बुकिंग प्राप्त झाल्याची माहिती आहे.
महिंद्रा एक्सयुव्ही 700
महिंद्रा ऍण्ड महिंद्राच्या शोरुम्समधून गाडय़ांचे बुकिंग करण्यासोबतच ऑनलाईन प्लॅटफॉर्मलाही मोठय़ा प्रमाणात ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे. यात एक दिवस 1 तासात महिंद्रा एक्सयुव्ही700 या मॉडेलचे बुकिंग 25 हजार इतकी राहिली आहे.
एमजी ऍस्टर
एमजी मोर्ट्सच्या नवी एमजी ऍस्टरला मात्र 20 मिनिटात 5,000 बुकिंग प्राप्त झाले आहे. यासोबतच एमजी ऍस्टर कारचा संपूर्ण साठा समाप्त झाला आहे. कंपनीने 25 हजार रुपयाच्या टोकन रक्कमेसोबत हे बुकिंग सुरु केले होते.









