नवी दिल्ली
विविध राज्यांमध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केलेली असली तरी मागणीत मात्र पेट्रोलने वरचढ राहणेच पसंत केले असल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबरमध्ये पेट्रोलची मागणी वाढून 2 हजार 750 मेट्रीक टन इतकी राहिली होती. गेल्या तीन वर्षातील एकाच महिन्यात झालेली ही सर्वाधिक विक्री असल्याचे बोलले जात आहे. 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या काळात पेट्रोल 7.45 रुपयांनी वाढले आहे. सप्टेंबरमध्ये 2 हजार 599 मेट्रीक टन पेट्रोलची मागणी झाली होती.









