महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे दिली माहिती
मुंबई : दिवसेंदिवस वाढणाऱया कोरोनाचा फटका बॉलिवूड क्षेत्रालाही बसला असून, बॉलिवूड अभिनेता महानायक बीग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर अमिताभ बच्चन यांना उपचारासाठी मुंबईतील नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आज अमिताभ बच्चन यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या रॉय-बच्चन तसेच त्यांची नात आराध्या बच्चन यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला सील करण्यात आला असून त्याला कन्टेंन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले. जलसामध्ये सद्या पालिकेचे डॉक्टर असून घरातील कर्मचाऱयांचीही कोरोना चाचणी केली जाणार आहे.