वार्ताहर / बांदा:
महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होत सिंधुदुर्ग विभागीय कामगार सेना जिल्हा सचिव आबा धुरी व महिला जिल्हा अध्यक्ष मानसी परब, कायदेशीर सल्लागार प्रकाश साखरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत एस. टी. कामगार संघटना तसेच इंटक संघटनेच्या सभासदांनी आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात कामगार सेनेत प्रवेश केला.
यापूर्वीही कामगार संघटनेचे माजी सचिव गुरू पिळणकर, मुळीक तसेच अन्य सभासदांनी कामगार सेनेत प्रवेश केला होता. यावेळी कामगार संघटनेचे कार्यकर्ते ए. पी. कदम, शिवाजी नागवेकर, एस. पी. निवेलकर, तेंडुलकर, माणगावकर अशा एकूण 20 सभासदांनी प्रवेश केला आहे.
यावेळी प्रवेशकर्त्यांचे शाल देऊन तसेच शिवबंधनाने स्वागत करण्यात आले. यावेळी सावंतवाडी कामगार सेना अध्यक्ष पुनाळेकर, सचिव वाडकर, उपाध्यक्ष मुळीक अणि आर. के. जाधव, कार्याध्यक्ष कापडी, कासार व सदस्य उपस्थित होते.
यावेळी सावंतवाडी आगारातील नवीन ऍलोकेशन्स, पुणे शिवशाही, सातारा क्रू चेंज, रत्नागिरी वस्ती, कर्मचाऱयांना लावली जाणारी डय़ुटी याबाबत चर्चा करण्यात आली. सदरचे सर्व प्रश्न विभाग नियंत्रक रसाळ यांच्याकडे मांडून कर्मचाऱयांना न्याय देण्याचे आश्वासन आबा धुरी अणि मानसी परब यांनी दिले.