खासगी वाहतूकदार उकळतायेत पैसे
प्रतिनिधी/ रत्नागिरी
एसटी कर्मचाऱयांच्या संपामुळे रत्नागिरी जिल्हय़ात प्रवाशांचा मनस्ताप सहन करावा लागत आह़े विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांचा खासगी वाहतूकीचा आधार घ्यावा लागत आह़े एसटीच्या संपामुळे खासगी वाहतूकदारांकडून प्रवासासाठी वाटेल ती किंमत सांगून पैसे उकळले जात आहेत़ एसटीच्या रत्नागिरी विभागाला मात्र या संपामुळे दिवसाला 60 लाख रूपयांचा फटका बसला आह़े, अशी माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आह़े
एसटी कर्मचाऱयांना पूर्णपणे शासकीय कर्मचाऱयांचा दर्जा द्यावा तसेच विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱयांकडून बंद पुकारण्यात आला आह़े बेमुदत संपामुळे सोमवारी एसटीच्या रत्नागिरी आगारातून केवळ 20 टक्के प्रवासी वाहतूक करण्यात आल़ी तर इतर तालुक्यातही 20 ते 40 टक्के पर्यंत वाहतूक सुरू असल्याचे सांगण्यात आल़े जिल्हय़ामध्ये एसटीच्या 4 हजार 500 फेऱयांना या संपाचा फटका बसला तर सुमारे 60 लाख रूपयांचे एका दिवसांत नुकसान झाल़े राज्यभर चालणारा हा संप संपण्याची चिन्ह सध्या दिसून येत नसल्याने आणखी मोठा फटका बसण्याची शक्यता आह़े
जिल्हय़ातील एसटी प्रवाशांचे अतोनात हाल झाल़े अनेक प्रवासी विविध बसस्टॅड, स्टॉपवर अडकून पडल़े प्रवाशांची पर्यायी व्यवस्था होवू शकल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आल़ा
चिपळुणात सर्व फेऱया अचानक झाल्या बंद
चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकातील कर्मचाऱयानीही सोमवारी अचानकपणे संप पुकारला. यामुळे सर्वच बसफेऱया रद्द झाल्याने एस्टी प्रवाशानां खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. इतकेच नव्हे तर ग्रामीण भागातून आलेल्या प्रवाशांना याची कोणतीच कल्पना नसल्याने ते दिवसभर बसस्थानकात बसून होते.
प्रवासी वाहतुकीचे पेंद्र असणाऱया शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात सोमवारी सकाळी 11.30 वाजेपर्यंत नियोजित फेऱया त्या-त्या मार्गावर रवाणा झाल्या होत्या. मात्र त्यानंतर बसस्थनकातील कार्यरत असणाऱया संघटनांनी संपाची हाक दिल्यानंतर त्यास प्रतिसाद देत प्रवाशांना कोणतीच कल्पना न देता अचानकपणे संप पुकाराला. अर्ध्या तासाच्या अवधीनंतर फलाटावर कोणतीच बसफेरी न आल्याने याचे कारण विचारल्यानंतर अखेर अचानकपणे संप पुकारल्याची माहिती प्रवाशांना मिळाली. ग्रामीण प्रवाशांना पुन्हा घरी जाण्यासाठी खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. यावेळी आलेरे, शिरगाव, पोफळी, रत्नागिरी, दसपटी, खाडी परिसर आदी मार्गाकडे जाणारे वडाप तुडूंब भरुन जात होते. या संपानंतर सर्व एस.टी. कर्मचारी मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र होत घोषणाबाजी केली, बसस्थानकात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बदोबस्त ठेवण्यात आला होता.
गुहागरात 100 टक्के एसटी कर्मचारी संपावर
राज्य परिवहन महामंडळाचे म्हणजेच एसटीचे विलिनीकरण महाराष्ट्र शासनामध्ये अधिकृतपणे व्हावे या व इतर मागण्यासाठी येथील एसटी आगारातील सर्व संघटनांच्या 354 कर्मचाऱयांनी एकत्र येत 100 टक्के काम बंद आंदोलन केले. या आंदोलनाला तालुका भाजपने पाठींबा दर्शवला आहे.
दापोलीत प्रवाशांचे तिकीटाचे 100 टक्के पैसे परत करणार
दापोली बस आगारातील परजिल्हय़ात अर्थात मुंबई, पुणे अशाठिकाणी जाणारे प्रवासी दापोली बसस्थानकात आले होते, परंतु अचानक झालेल्या संपामुळे या प्रवाशांनी गाडीचे तिकीट रद्द करून घेतल्याचे समोर आले. प्रवाशांचे तिकिटाचे 100 टक्के पैसे परत केले जाणार असल्याचे दापोलीच्या आगार व्यवस्थापिका मृदुला जाधव यांनी सांगितले. अचानक होणाऱया संपामुळे परतीच्यावेळी हाल होणार असल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे यापुढे कर्मचाऱयांनी सर्वसामान्य जनतेचा विचार करून पूर्वकल्पना देऊन संप करावेत असे प्रवाशांमधून बोलले जात आहे.
खेडमध्येही एसटी कर्मचाऱयांच्या संपामुळे शेकडो प्रवासी रखडले!
एसटी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपात येथील एसटी आगारातील कर्मचारीही उतरल्याने सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून एसटी सेवा ठप्प झाली. परजिल्हय़ात जाणाऱया बसेस येथील बसस्थानकातच थांबवण्यात आल्याने अनेक प्रवाशी स्थानकातच रखडले. तालुक्याबाहेर जाणाऱया सर्व एसटी बसेसही रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.
राजापूरात एसटी कर्मचाऱयांचा संप यशस्वीचा दावा
सोमवार सकाळ पासून राजापूर आगारातून सुटणाऱया सर्व गाडय़ा बंद आहेत. ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असे कर्मचाऱयांनी स्पष्ट केले. राजापूर आगारातर्फे पुकारण्यात आलेला संप यशस्वी झाल्याचा दावा कर्मचाऱयांकडून करण्यात आला. सर्व मार्गावर एसटी सेवा बंद असल्याने प्रवासी वर्गाला याचा फटका बसला. क्लासेसना येणारे विद्यार्थी व सामान्य नागरीकांची ससेहोलपट झाली. काही नागरीकांनी व विद्यार्थ्यानी खाजगी वाहनांचा आधार घेत घर गाठले.
मंडणगडात आंदोलनात सहभागी न झालेल्या कर्मचाऱयांना घातले हार
सोमवारी पहाटेपासूनच मंडणगड आगारातील एस.टी. कर्मचाऱयांनी आगाराच्या बाहेर घोषणाबाजी करत आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी अन्य आगारातून आलेल्या गाडय़ांमधील वाहक-चालक अन्य कर्मचाऱयांसोबत आंदोलनात सहभागी न झाल्यामुळे त्यांचा हार घालून आंदोलन करण्यात आले. सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे दिवाळी सणासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. याचा फायदा खाजगी वाहतूक करणाऱयांना झाला. यामुळे मंडणगड ते मुंबई 500 रूपये असलेले प्रवास भाडे 800 रूपयांवर गेले. तरीदेखील अनेकांना प्रवास करण्यासाठी वाहने मिळालेली नाहीत.
देवरुख आगारातील कर्मचारी रात्री 12 वाजल्यापासून संपावर जाणार
एसटी कर्मचाऱयांना पूर्णपणे शासकीय कर्मचाऱयांचा दर्जा द्यावा सर मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या संपात देवरुख आगारातील कर्मचारी सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून संपावर जाणार होते. याबाबतचे निवेदन कमचारी संघटनेने आगार व्यवस्थापकांना दिले होते.
लांजा आगाररातील कर्मचारी संपापासून अलिप्त
1 व 2 नोव्हेंबर रोजी असे दोन दिवस लांजा एस टी आगारातील कर्मचाऱयांनी राज्यभरात पुकारलेल्या संपामध्ये सहभाग दर्शवत आपल्या मागण्यांसाठी आक्रमकपणा घेतला होता. मात्र आमदार राजन साळवी यांच्या मध्यस्थीनंतर कम्रचाऱयांनी हे आंदोलन मागे घेतले होते. सोमवारी एस्टी कर्मचाऱयांनी पुकारलेल्या संपामध्ये लांजा आगारातील एसटी कर्मचाऱयांनी संपामध्ये सहभाग घेतला नव्हता. लांजा आगारातील एसटीची वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्याची माहिती लांजा आगारप्रमुख्य संदीप पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.









