जान्हवी पाटील / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुका गुरुवारी पूर्णपणे पाण्याखाली गेला, यामध्ये चिपळूण बसस्थानकात पहाटे पाणी शिरतेय लक्षात येताच आगरव्यवस्थापक रणजीत राजशिर्के यांनी याठिकाणी धाव घेतली.
आधी १० कर्मचाऱ्यांना बाहेर काढले त्यानंतर एसटीची साडेसात लाखाची कॅश घेतली बाहेर येईपर्यंत पाणी मानेपर्यंत आले होते म्हणून त्यांनी सर्व कर्मचारी यांना घेऊन एसटीच्या टपावर जाऊन बसले पहाटे ५ ते दुपारी ३ पर्यंत ते टपावर होते. आणखीन उशीर झाला असता तर ही एसटी ही बुडणार होती, मात्र तितक्यात इंडिआरएफ च्या जवानांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. मुळात अडचणीत असलेल्या एसटीची मालमत्तेचे नुकसान होऊ नये आपले कर्मचारी सुखरूप राहावेत म्हणून आगरव्यवस्थापक राजशिर्के यांनी दाखवलेले धाडस खरोखरच कौतुकास्पद आहे. विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांनी या टीम चे अभिनंदन केले आहे.