मुंबई
जीवन विमा क्षेत्रातील दिग्गज कंपनी एलआयसीचा आयपीओ भारतीय भांडवली बाजारात दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदरचा आयपीओ आर्थिक वर्षाअखेर शेअरबाजारात दाखल केला जाणार आहे. एलआयसीच्या आयपीओ सादरीकरणाला मंत्रिमंडळाच्या अर्थ समितीने मंजुरी दिली आहे. आर्थिक वर्षात अखेरीस एलआयसीचा आयपीओ बाजारात दाखल होऊ शकतो. सदरचा आयपीओ मार्च 2022 पर्यंत बाजारात दाखल होण्याची शक्यता सांगितली जात आहे. देशातील आजवरचा हा सर्वात मोठा आयपीओ ठरणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.









