आयपीओ आरक्षित करताना पोर्टलवर सविस्तर माहिती अपडेट करावी लागणार : पॉलिसीधारकांना अधिकचा लाभ शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा (एलआयसी) आगामी काळात आयपीओ सादर होणार आहे. सदरचा आयपीओ आरक्षित करावयाची सुविधा कंपनीकडून मिळणार आहे. याकरीता ग्राहकांकडे दोन गोष्टी असणे आवश्यक आहे. पहिली एलआयसी पोर्टलवर पॅन अपडेट करणे दुसरी बाब म्हणजे डीमॅट खाते असणे आवश्यक आहे. यासर्व गोष्टींची तयारी लवकरच करावी लागणार आहे, कारण एलआयसीचा आयपीओ येत्या मार्च महिन्यात सादर होण्याची शक्यता अधिक आहे.
एलआयसीच्या आयपीओमधून 31 कोटी 62 लाख 49 हजार 885 समभागांची विक्री करण्यात येणार आहे. जी 5 टक्के हिस्सेदारीच्या बरोबरीत राहणार आहे. यामध्ये 10 टक्के म्हणजे 3.16 कोटी समभाग त्याकरीता गुंतवणूकदारांना आयपीओ आरक्षित करण्यासाठी संबंधीताकडे एलआयसीची कोणतीही पॉलिसी असल्यास त्यांना या योजनेचा अधिकचा लाभ होणार असल्याची माहिती आहे.
कसा घ्याल लाभ
1. पॉलिसीधारकांना 28 फेबुवारीच्या अगोदर पॅन अपडेट न झाल्यास आयपीओचे आरक्षण करता येणार नाही.
2.सदरची सुविधा घेण्यासाठी एलआयसीचे पोर्टल वापरणे आवश्यक आहे.
3.एलआयसीची वेबसाईट वापरता येणार 4.ईमेल, पॅन, मोबाईल नंबर, जन्म तारीख व पॉलिसी नंबर भरावा लागणार









