बेळगाव/ प्रतिनिधी
येथील युनियन जिमखाना मैदानावर एमएसडी चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला रविवार दि. 3 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे.
सदर स्पर्धेत 9 संघांनी भाग घेतला असून त्यामध्ये जैन इलेव्हन, जैन शूटर, जैन युनायटेड, जैन स्पारटन, जैन सुपर किंग्ज, जैन चॅम्पियन्स, जैन फेंड्स, जैन महावीरक्स, जैन ब्लॉस्इटर आदी संघांनी भाग घेतला आहे. ही स्पर्धा 3 दिवस चालणार असून मंगळवारी अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. रविवारी उद्घाटनचा सामना जैन इलेव्हन वि. जैन चॅम्पियन्स यांच्यात होणार आहे.









