वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने वर्ष 2004-2015 या कालावधीमध्ये प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (एफडीआय) प्रकल्पांकडे आकर्षित करण्यात पहिल्या पाच देशांमध्ये स्थान पटकावत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.
याच दरम्यान अन्य देशांसोबत भागीदारी आणि एकत्रितपणे काम करण्याच्या यादीत भारत आठव्या स्थानी राहिलेला आहे. असा तपशील ‘फ्यूचर ऑफ रीजनल को-ऑपेरेशन इन इंडिया ऍण्ड पॅसिफिक’ या मथळय़ाखाली सादर करण्यात आलेल्या एक शोध निबंधातून मांडण्यात आला आहे.
आशियाई विकास बँक यांच्या वेबसाईटवर उपलब्ध झालेल्या माहितीनुसार 2004 ते 2015 या कालावधीमध्ये भारताला एकावेळी नवीन 8,004 एफडीआय प्रकल्प प्राप्त झाले आहेत. 4 हजार 918 प्रकल्प संपादन आणि विलीनीकरण प्रक्रियेतून प्राप्त झाल्याचे सांगण्यात येते.









