वृत्तसंस्था/ सोफिया
एटीपी टूरवरील येथे झालेल्या सोफिया पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत इटलीच्या 19 वर्षीय जेनिक सिनेरने एकेरीचे जेतेपद पटकाविताना कॅनडाच्या पोस्पिसीलचा पराभव केला. गेल्या 12 वर्षांच्या कालावधीत एटीपी टूरवरील स्पर्धेत विजेतेपद मिळविणारा सिनेर हा सर्वात तरूण टेनिसपटू ठरला आहे.
एटीपीच्या क्रमवारीत 44 व्या स्थानावर असलेल्या 19 वर्षीय सिनेरने शनिवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात कॅनडाच्या व्हॅसेक पोस्पिसीलचा 6-4, 3-6, 7-6, (7-3) असा पराभव केला. 2020 च्या टेनिस हंगामातील सिनेरचा हा 19 वा विजय आहे. आधुनिक टेनिस क्षेत्रामध्ये एटीपी टूरवरील स्पर्धेत सिनेर आता विजेतेपद मिळविणारा सर्वात तरूण टेनिसपटू ठरला आहे. 2008 साली जपानच्या निशीकोरीने हा बहुमान डिलेरी बिच खुल्या टेनिस स्पर्धेत मिळविला होता.









