प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्यावतीने शहरात प्लास्टिक विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील प्लास्टिकची विक्री राजरोसपणे सुरू आहे. प्लास्टिकचा वापर टाळावा असे आवाहन वारंवार करूनही याची दखल घेण्यात येत नाही. बंदी झुगारून प्लास्टिक विक्रीचा सुळसुळाट सुरू असल्याने सोमवारी चार दुकानांवर धाड टाकून एक टन प्लास्टिक पिशव्या जप्त करण्याची कारवाई मनपाच्या आरोग्य विभागाने राबविली. या वर्षात पहिल्यादांच इतक्मया मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्याची कारवाई मनपाने केली आहे.
राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी घातली असून याची अंमलबजावणी महापालिकेच्यावतीने करण्यात येत आहे. शहरातील प्लास्टिक विपेत्यांवर धाडी टाकण्याची कारवाई येते. त्याचप्रमाणे उत्पादन करणाऱया फॅक्टरी बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे. तरीदेखील शहरात प्लास्टिकचा वापर होत आहे. परराज्यामधून येणाऱया प्लास्टिकवर बंदी घालून काटेकोरपणे प्लास्टिक बंदीची कारवाई करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. दि. 2 ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंदीची कारवाई संपूर्ण देशात राबविण्याची घोषणा करण्यात आली आहे. काही राज्यात याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत आहे. तरीदेखील बेळगाव शहरात प्लास्टिकची विक्री आणि वापर सुरू आहे. यामुळे सोमवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील प्लास्टिक विपेत्यांवर धाड टाकण्यात आली. यावेळी चार दुकानांवर धाड टाकून एक टनाहून अधिक प्लास्टिक जप्त करण्यात आले.
महापालिकेच्यावतीने ही कारवाई निरंतरपणे चालणार असल्याची माहिती मनपाच्या अधिकाऱयांनी दिली. दि. 2 ऑक्टोबरपासून शहरात प्लास्टिक बंदीची कारवाई राबविण्यात येत आहे. पण प्रथमच इतक्मया मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक पिशव्याचा साठा जप्त करण्याची कारवाई मनपाच्या पथकाने केली. या कारवाईवेळी महापालिकेचे साहाय्यक पर्यावरण अभियंते अदिलखान पठाण, सादीक धारवाडकर, कांबळे, आणि स्वच्छता निरीक्षक आदीवासी आदीसह स्वच्छता निरीक्षक, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.









