पेडणे बसस्थानकाचे दोन वेळा उद्घाटन करूनही या बसस्थानकावर असलेल्या शौचालय व अन्य सुविधा नसल्याबद्दल गोवा राज्य शिवसेना उपप्रमुख सुभाष केरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त : गोवा राज्य शिवसेना उपराज्यप्रमुख सुभाष केरकर

प्रतिनिधी /पेडणे
पेडणे बसस्थानकाचे दोन वेळा उद्घाटन करूनही या बसस्थानकावर असलेल्या शौचालय व अन्य सुविधा अजूनही नागरिकांना योग्य प्रकारे मिळत नसल्याबद्दल गोवा राज्य शिवसेना उपप्रमुख सुभाष केरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे बसस्थानकासोमर एक कोटी रुपये खर्च करुन बांधलेले बंद असलेल्या शौचालयाची सरकारने चौकशी करावी अशी मागणी गोवा राज्य शिवसेना उपराज्यप्रमुख सुभाष केरकर यांनी केली.
सुभाष केरकर , दशरथ आरोसकर, प्रशांत तळवणेकर , अनिल तळवणेकर आदिनी पेडणे कंदबा बसस्थानकातील शौचालयाची पहाणी केल्यानंतर ते पञकारांकडे बोलत होते. करोडो रुपये खर्च करुन आणि दोनवेळा उद्घाटन करुनही पेडणे बसस्थानकावर सुविधांचा अभावः सुभाष केरकर
पेडण्यातील पत्रकारांकडे बोलताना ते म्हणाले की, विद्यमान पेडणेचे आमदार आणि गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर तसेच तत्कालीन या भागाचे मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी दोन वेळा या बसस्थानकाचे उद्घाटन केले होते . राजेंद्र आर्लेकर यांनी उद्घाटन केल्यानंतर परत त्या नंतरच काही महिन्यानंतर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी या बस स्थानकाचे उद्घाटन केले. यावर लाखो रुपये खर्च करून या बस स्थानकाचे उद्घाटन दोन वेळा करूनही या बसस्थानकावर ज्या सोयी-सुविधा पाहिजे त्या नागरिकांना आजही मिळत नसल्याबद्दल सुभाष केरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या बसस्थानकावर असलेले शौचालय याची योग्य ती देखरेख आणि स्वच्छता न ठेवल्याने दुर्गंधी पसरली आहे. याकडे संबधीत यंञणेचे लाक्ष नाही. पेडणे येथे असलेले शौचालय हे दुर्गंधीमय झाले असून या शौचालयात दोन मिनिट सुद्धा थांबणे अवघड होऊन बसले आहे.
या भागाचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे आपण विकास केला आणि विकासाच्या बाता मारत आहेत. मात्र या शौचालयाचे विकास करण्यासाठी आणि त्यांची देखभाल ठेवण्यासाठी ते अपयशी ठरले असल्याचे सुभाष केरकर म्हणाले. बाबू आजगावकरांनी याकडे लक्ष देऊन शौचालय स्वच्छता ठेवण्यासाठी पाऊले उचलावी अशी मागणी केली आहे.
एक कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या आणि बंद असलेल्या शौचालयाची सरकारने चौकशी करावीः सुभाष केरकर
पेडणे बस स्थानकाच्या समोर रस्त्याच्या बाजूला गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे सुमारे एक कोटी रुपये खर्च करून शौचालय बांधण्यात आले आहे. मात्र हे शौचालय एक कोटी रुपये खर्च करून अजूनही बंद आणि या शौचालयाला कुलूप लावले असल्याने नागरिकांना त्रास होत असून नागरिकाने शौचालयास किंवा लघवीसाठी कुठे जावे हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कंदबा स्थानकावर असलेले शौचालयही दुर्गंधीयुक्त असून नागरिक तसेच प्रवाशी यांची कुचंबणा होत आहे. एक कोटी रुपये खर्च करुन शौचालय बांधणे हा मोठा विनोद असून यासाठी जास्तीत जास्त पंचवीस ते तीस लाख रुपये खर्च येणार आहे. मात्र या शौचालयावर सुमारे एक कोटी खर्च केल्याचे सांगण्यात येत असून याला कुलूप लावून बंद ठेवण्यात आले आहे.
गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे बांधण्यात आलेल्या त्या पैशाबाबत आणि झालेल्या खर्चाबाबत चौकशी करावी, अशी मागणी गोवा राज्य शिवासेना उपराज्य प्रमुख सुभाष केरकर यांनी केली आहे.
यावेळी बोलताना श्री पार्सेकर या ग्रामस्थाने बस स्थानकावरील शौचालयाची स्वच्छता करुन प्रवाशी व नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे. शौचालयाची देखभाल न ठेवल्याने य शौचालयामध्ये दुर्गंधी पसरली असून या भागात येणे कठीण होऊन बसले आहे.या भागाची स्वच्छता ठेवावी, अशी मागणी श्री .पार्सेकर यांनी केली आहे.









