वृत्तसंस्था/ मुंबई
2021 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी होणाऱया क्रिकेटपटूंच्या लिलावामध्ये स्पर्धा आयोजकांनी 8 विदेशी आणि 2 भारतीय अशा एकूण 10 क्रिकेटपटूंचा गट वेगळा ठेवला असून या क्रिकेटपटूंना किमान बोली प्रत्येकी 2 कोटी रुपयांची राहील.
ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, इंग्लंडचे मोईन अली, सॅम बिलिंग्ज, प्लंकेट, जेसन रॉय आणि मार्क वूड, बांगलादेशचा शकीब अल हसन, भारताचे हरभजन सिंग आणि केदार जाधव यांचा या गटामध्ये समावेश आहे. 18 फेब्रुवारी रोजी चेन्नईत आयपीएल स्पर्धेकरिता क्रिकेटपटूंचा लिलाव आयोजित केला असून यामध्ये एकूण 292 क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. या क्रिकेटपटूंमध्ये 164 भारतीय तर 125 विदेशी व तीन संलग्न सदस्य देशाचे आहेत. क्रिकेटपटूंच्या लिलाव कार्यक्रमासाठी नोंदणी झालेल्या खेळाडूंत कपात करून 1114 खेळाडूची यादी तयार करण्यात आली आहे. सदर स्पर्धा एप्रिल-मे दरम्यान होणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाने स्टीव्ह स्मिथसह एकूण 8 खेळाडूंना करारातून मुक्त केल्याचे गेल्या महिन्यात जाहीर केले होते.
कडे सोपविण्यात आले आहे. राजस्थान रॉयल्स संघाने आगामी आयपीएल स्पर्धेसाठी गेल्या महिन्यात 8 खेळाडूंची नावे जाहीर केली. मात्र इंग्लंडचे बेन स्टोक्स, आर्चर आणि बटलर यांना त्यांनी कायम ठेवले आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने 9 खेळाडूंना मुक्त केले असून ऑस्ट्रेलियाच्या मॅक्सवेलचा त्यात समावेश आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाला अकरा खेळाडूंना खरेदी करता येणार असून त्यात तीन विदेशी खेळाडू त्यांना घ्यावे लागणार आहेत.









