नवी दिल्ली
एएमओ इलेक्ट्रिक बाईक्स या कंपनीने आपली नवी जाँटी प्लस ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात दाखल केली आहे. दिल्लीत या स्कूटरची एक्सशोरूम किंमत 1 लाख 10 हजार रुपये इतकी असणार आहे. या गाडीला 60 वॉटची लिथीयम बॅटरी असणार असून एकदा चार्ज केल्यावर ही स्कूटर सुमारे 120 किलोमीटर अंतर धावणार आहे. गाडी पूर्ण चार्ज होण्यासाठी 4 तासाचा अवधी लागतो. प्रुझ कंट्रोल स्वीच, इएबीएस आणि अँटी थेफ्ट अलार्म सारख्या सुविधा या गाडीत आहेत.









