मुंबई
आयफोनच्या क्षेत्रामध्ये नावाजलेली कंपनी ऍपल आपले पहिलेवहिले ऑनलाईन स्टोअर भारतात सुरू करणार असल्याचे समजते. ऍपलचे पहिले स्टोअर सप्टेंबरमध्ये भारतात लाँच होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मुंबईतील स्टोअरचे काम प्रगतीपथावर असून ते 2021 मध्ये प्रत्यक्ष सुरु होण्याची शक्मयता कंपनीने वर्तवली आहे. पहिल्यावहिल्या ऑनलाइन स्टोअरमुळे कंपनीचा भारतातला हा पहिलाच प्रवेश असेल असे सांगितले जात आहे.
आयफोन निर्माती कंपनी ऍपल आपली उत्पादने भारतात तिऱहाईकामार्फत आजवर विक्री करते आहे. ऑनलाइन स्टोअर झाल्यावर मात्र कंपनीची विक्रीची चिंता कायमस्वरूपी मिटणार आहे. जागतिकदृष्टय़ा मागणीचा कल पाहता स्मार्टफोन्ससाठी भारतीय बाजारपेठ सर्वात मोठी समजली जाते. त्यामुळेच कंपनीने भारतात आपले बस्तान ऑनलाइन स्टोअरच्या माध्यमातून बसवण्याचे निश्चित केले आहे. दिवाळीच्या उत्सवी काळात स्मार्टफोन्स विक्री करता कंपनी जास्तीत जास्त प्रयत्न करताना दिसेल.









