नवी दिल्ली
आयफोन क्षेत्रातली नावाजलेली कंपनी ऍपलने वॉच सिरीज 6 आणि वॉच एसई ही दोन स्मार्ट घडय़ाळे भारतात विक्रीकरता उपलब्ध केली आहेत. ही उत्पादने ऍपलच्या ऑनलाइन स्टोरवर ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. ऍपलच्या साइटवर खूप सारी उत्पादने ग्राहकांना पाहता येणार आहेत. ऍपल वॉच सिरीज 6, ऍपल वॉचेस एसई आणि आयपॅड ही उत्पादने संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऍपल वॉच सिरीज 6 ची किंमत 40 हजार 900 रुपये तर ऍपल वॉच एसईची किंमत 29 हजार 900 रुपये इतकी असणार आहे.









