ब दलत्या जीवनशैलीमध्ये शरीरात लहानसहान वेदना होणं ही सामान्य बाब आहे. पण छोटय़ा-छोटय़ा आजारांसाठी डॉक्टरांकडे जाणं शक्मय होत नाही किंवा ते खिशाला परवडणारं नसतं. त्यावर एकच उपाय तो म्हणजे ऍक्मयुप्रेशर. ऍक्मयुप्रेशरने अशा लहान सहान वेदना काही मिनिटातच दूर होतात.
शरीराच्या कुठल्याही दुखऱया भागावर बोटांनी किंवा हातांनी दाब दिल्यामुळे आपल्या दुखऱया ह्याचा अर्थ बळकट करणारा किंवा प्रवाहात निर्माण झालेला अडथळा दूर करणारा दाब उपचार पद्धती ही एक अशा प्रकारची पद्धत आहे, की जी पूर्वापार चिनी औषधात किंवा आरोग्याची काळजी घेणारी पद्धत जिचा मूळ शोध हजारो वर्षापूर्वी चीनमध्ये लागला व या उपचार पद्धतीचा प्रयोग विपुल प्रमाणात अशिया खंडात आज केला जातो.
काही संशोधने असे सुचवतात की स्ट्रोकमुळे येणारा अशक्तपणा, मळमळ, शिसारी, वेदना यामधे अŸक्मयुप्रेशर प्रभावी ठरू शकते. विशि÷ लक्षणांसाठी किंवा सुदृढ आरोग्यासाठीही एका बिंदूवर दाब देण्याने आराम मिळू शकतो किंवा बिंदूची मालिका एका विशि÷ पध्दतीत काम करू शकते.
- बदलत्या हवामानामुळे सर्दी-खोकला होणं ही खूप सामान्य बाब आहे, त्यासाठी जास्त पॉवर असलेली औषधं घेतल्याने रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. त्याऐवजी दोन्ही पायांच्या अंगठय़ावरील भागावर प्रेशर दिल्यास सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.
- रोजच्या कामामुळे अनेक चिंता असतात, तणाव असतात, त्यासाठी पायांच्या बोटांवर प्रेशर द्या. याने शरीरातील तणाव निर्माण करणाऱया हार्मोन्सची पातळी कमी होते आणि काही क्षणातच विश्रांती मिळते.
- रोजच्या या गर्दीच्या आयुष्यात डोकेदुखी होणे सामान्य बाब आहे पण त्यासाठी सारखं डॉक्टरांकडे जाणे किंवा औषधं खाण्यापेक्षा आपल्या हातांच्या बोटांवरील भागाने मसाज केल्याने डोकेदुखी क्षणात निघून जाते.
- महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान खूप त्रास होतो. महिलांना या काळात
ऍक्मयुप्रेशरने फार आराम मिळतो, पायाच्या खालील बाजूस हलके प्रेशर द्या. असे सलग दहा मिनिटे केल्याने मासिक पाळीच्या सुरुवातीच्या दिवसात होणाऱया त्रासापासून मुक्तता मिळते.