नवी दिल्ली
गेल्या ऑक्टोबरमध्ये ऊर्जा वापरात चांगली वाढ झाली असल्याची बाब समोर आली आहे. ऑक्टोबरमध्ये 114 अब्ज युनिट उर्जेचा वापर करण्यात आला आहे. मागच्या वर्षी याच महिन्यात वापर 109 अब्ज युनिट इतका होता. त्या तुलनेत 4 टक्के इतकी वाढ याखेपेस दिसली आहे. कोळसा टंचाईतून सुटका मिळाल्याने ऊर्जा निर्मिती प्लांटमध्ये पुन्हा निर्मिती कार्य वेग घेते आहे. ऑक्टोबरमध्ये एकाच दिवशी 174 जीडब्ल्यू इतकी ऊर्जा वितरीत करण्यात आली आहे.









