कराची / वृत्तसंस्था
पाकिस्तानचा फलंदाज उमर अकमलवरील 3 वर्षांच्या बंदीत कपात करत ती 18 महिन्यांवर आणण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. पण, उमरने आपण अद्याप या निर्णयावर समाधानी नसून निलंबन पूर्ण रद्द करण्यासाठी दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. अकमलवरील सुधारित बंदी कालावधी फेब्रुवारी 2020 ते ऑगस्ट 2021 असा असेल. 30 वर्षीय उमर अकमलवर लाचखोरीसाठी संपर्क साधला गेल्याची माहिती लपवल्याचा आरोप आहे.









