हिंदू धर्मात उपवास, व्रतवैकल्यांची कमतरता नाही. उपवासामुळे शरीराला आराम मिळतो. बरेच जण आठवडय़ातून एक दिवस उपवास करतात. उपवास आरोग्यकारक आहे यात शंका नाही. उपवासाच्या लाभांविषयी…
* सतत काहीबाही खात राहिल्यामुळे शरीरात विषारी घटक साचू लागतात. उपवासामुळे शरीरातली ऊर्जा वापरली जाते आणि चरबी कमी होते. उपवासादरम्यान फळांचे रस किंवा इतर द्रवपदार्थ घेतल्यास शरीर आतून स्वच्छ होतं.
* उपवासामुळे मनःशांती मिळते. काही न खाल्यास शरीरात एंडोर्फिनची पातळी वाढते आणि याचा मनारोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. उपवास म्हणजे शरीरातील आतील अवयवांचा व्यायामच म्हटला पाहिजे.
* आतडय़ांची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी उपवास करायला हवा. वयापरत्वे व्यक्तीच्या आतडय़ांमधल्या पेशींच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. मात्र उपवासादरम्यान पेशी ग्लुकोजऐवजी फॅटी ऍसिडचा वापर करतात आणि त्यांना बळकटी मिळते.
* उपवासामुळे रोगप्रतिकारकशक्तीही वाढते.
* मधुमेहींनी उपवास ठेवल्यास त्यांच्या रक्तातल्या साखरेची पातळी कमी होते. मधुमेह नियंत्रणात राहतो.
* उपवास लाभदायी असला तरी तो योग्य पद्धतीने करायला हवा. 24 तासांपेक्षा अधिक काळ उपाशी राहू नये. सतत पाणी पित रहायला हवं. उपवास सोडताना प्रथिनयुक्त सकस आहार घ्या.









