लवकरच नव्या घरात प्रियकरासोबत होणार शिफ्ट
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असून लवकरच ती त्याच्यासोबत एका नव्या घरात राहायला जाणार आहे. जॅकलीनचा प्रियकर अभिनेता नसून एक उद्योजक असल्याचे समजते. तसेच हा उद्योजक दक्षिण भारतातील असल्याचे मानले जात आहे.

जॅकलीन मागील 2 महिन्यांपासून जुहू आणि वांद्रा येथे बीच-फेसिंग घराचा शोध घेत होती. अनेक प्रॉपर्टी पाहिल्यावर जॅकलीन आणि तिच्या प्रियकराने जुहूमध्ये एक सी-फेसिंग बंगला निवडला आहे. या बंगल्याच्या इंटीरियरच्या कामासाठी जोडप्याने फ्रान्सच्या एका डिझायनरची निवड केली आहे. या घरात जॅकलीनच्या प्रियकराचे ऑफिस असणार असून लवकरच तो मुंबईत स्थायिक होणार आहे. जॅकलीनचे यापूर्वी दिग्दर्शक साजिद खान याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. अनेक वर्षे एकत्र राहिल्यावर जॅकलीन आणि साजिद यांचे रिलेशन संपुष्टात आले होते.









