इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पदवी कॉलेज होणार खुली
प्रतिनिधी/ बेळगाव
तब्बल आठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा कॉलेजमधील ‘दुनियादारी’ अनुभवता येणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार मंगळवार दि. 17 नोव्हेंबरपासून इंजिनिअरिंग, डिप्लोमा व पदवी महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थी व प्राध्यापकांना कोरोना चाचणीची सक्मती करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा कॉलेज परीसर गजबजणार आहे.
कोरोना आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे राज्यातील महाविद्यालये मार्च महिन्यापासून बंद ठेवण्यात आली होती. सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असल्याने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केवळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पण जे विद्यार्थी ऑफ लाईन क्लासेससाठी महाविद्यालयात येणार आहेत त्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक राहणार आहे.
कोरोना चाचणीच्या सक्तीमुळे नाराजी
कॉलेज सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली असली तरी त्यातही अडथळे आहेत. कोरोना चाचणी प्रमाणपत्र सादर करणाऱया विद्यार्थ्यालाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र महाविद्यालयात किती विद्यार्थी ऑफलाईन क्लासेसकरिता उपस्थित राहणार आहेत त्यांची यादी महाविद्यालयाने तयार करून संबंधित विभागातील नगर आरोग्य केंद्रात दिल्यास त्या केंद्राच्यावतीने महाविद्यालयातच विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
या ठिकाणी मिळेल कोरोना प्रमाणपत्र
कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मात्र विद्यार्थी नगर आरोग्य केंद्रात आल्यास गर्दी होण्याची शक्मयता आहे. हे लक्षात घेऊन कोरोना चाचणीसाठी महाविद्यालयातच जाऊन स्वॅब तपासणी करण्याचे नियोजन आरोग्य खात्याने केले आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास स्वॅब तपासणी अन्यथा रॅपिड फायर टेस्टचे प्रमाणपत्र सादर करता येणार आहे. बेळगाव शहरात अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. तर तालुक्मयाच्या महत्त्वाच्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थी जाऊन हे प्रमाणपत्र निशुल्क घेऊ शकतात.
डॉ. संजय डुमगोळ (तालुका आरोग्य अधिकारी)
विविध महाविद्यालयाच्यावतीने ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेस सुरू करण्यात येणार आहेत. पण कोविड चाचणी प्रमाणपत्र केवळ ऑफलाईन क्लास अटेंड करणाऱया विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहे. प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात येणार आहे. सध्या विद्यालयातील कर्मचारी वर्ग व प्राध्यापकांची कोरोना चाचणी करण्याचे काम सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांची यादी तयार झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयात एकाचवेळी विद्यार्थ्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहे. त्याकरिता नगर आरोग्य केंद्राचे कर्मचारीच महाविद्यालयात जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली.









