पेडणे (प्रतिनिधी )
पेडणे अबकारी कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन रविवारी 25 रोजी दसरोत्सवा दिवशी होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंञण पञिकेवर पेडणे पालिकेच्या नगराध्यक्षा या प्रथम नागरिक असून सुध्दा या निमंत्रण पञिकेत नगराध्यक्षाचे नाव वगळे आहे. त्यामुळे पेडणे मतदारसंघाचे आमदार तथा उपमुख्यमंञी बाबू आजगावकर यांनी जर पेडणे पालिकेच्या नगराध्यक्षाचे नाव कार्यक्रम पञिकेत तसेच उद्घाटन पाटीवर संबंधित खात्याने तथा सरकारने घातले नाहीतर आपण कार्यक्रमावर बहिष्कार घाणार जाहिर केले.
पेडणे येथील अबकारी इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री डा?.प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी निमंञीत पाहुणे म्हणून उपमुख्यमंञी बाबू आजगावकर , मांदे मतदार संघाचे आमदार दयानंद सोपटे आणि म्हापसाचे आमदार तथा गोवा साधन सुविधा विकास मंडळाचे चेअरमन जोशवा डिसोझा हे उपस्थित राहणार आहेत.
पेडणे पालिका क्षेत्रात हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला पेडणेच्या नगराध्याक्षा श्वेता कांबळी यांचे नाव निमंञक पञिकेवर डावलल्याने याबाबत पेडणेत बरीच चर्चा झाली. नागरिकांनी या सरकारच्या या चुकीबद्दल नाराजी व्यक्त केली.
पेडणे मतदारसंघाचे आमदार तथा उपमुख्यमंञी यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी यावर आक्षेप घेत जर नगराध्यक्षांचे नाव निमंञण पञिकेवर तसेच उद्घाटन पाटीवर डावलल्यास आपण या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घालणार असल्याचे पञकाराना सांगितले .









