प्रतिनिधी/ सातारा
खासदार उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्ताने दि. 1 फेब्रुवारीपासून स्वच्छ माझी कॉलनी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी शाहुनगर, जगतापवाडी, रामराव पवारनगर या विभागातील 24 कॉलन्यांनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षिस 21 हजार रुपयांचे तर द्वितीय बक्षिस 15 हजार रुपये तर तृतीय बक्षिस 11 हजार रुपयांचे असून तसेच सहभागी झालेल्या सर्व कॉलन्यांना एक बेंच मिळणार आहे. मुळातच शाहुनगरवासियांना ही संकल्पना खूप आवडली आहे. उत्स्फुर्तपणे सर्व कॉलन्यांनी यात सहभाग नोंदवून प्रत्येक कॉलनीमध्ये एकजुट होऊन आपआपल्या कॉलन्या स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. या अनोख्या स्पर्धेचे कौतुक होत आहे.
शाहुनगरमध्ये जवळ जवळ 30 ते 35 कॉलन्या आहेत. या सर्व कॉलन्या तसेच मुख्य रस्ते यांची स्वच्छता रहावी. रस्त्यावर कचरा पडू नये अशी भावना सर्वच नागरिकांमध्ये होती. पण यासाठी नागरिकांचा सहभाग असणे गरजेचे होते. यासाठी सागर भोसले यांनी स्वच्छ माझी कॉलनी या स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले. व त्यास नागरिकांचा सहभाग असणे गरजेचे होते. त्यास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेसाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी जय सोशल फौंडेशनची टीम प्रत्येक कॉलनीत जाऊन सकाळी 7 ते 9 या वेळेत श्रमदान करत आहे. ज्या ज्या कॉलन्यात स्वच्छता झाली आहे. त्या कॉलन्यांमध्ये जय सोशल फेंडेशनच्यावतीने स्वच्छ माझे अंगण, सुंदर माझी रांगोळी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे स्वच्छतेत अजून एक भर पडून नागरिकांमध्ये स्वच्च्छतेच्या बाबतीत एकजुट होईल, असे मत सागर भोसले यांनी व्यक्त केले आहे. या स्पर्धेचे परिक्षण दि. 20 व दि. 21 फेब्रुवारीला होणार आहे. दि. 22 रोजी बक्षिस वितरण करण्यात येणार आहे.








