प्रतिनिधी/ बेळगाव
परंपरा खंडित होऊ न देता शिवप्रति ष्ठान हिंदुस्थानने यावषीही मर्यादित स्वरुपात 9 दिवस दुर्गामाता दौड काढली. केवळ सहा धारकऱयांच्या उपस्थितीमध्ये दौड काढण्यात आली. रविवारी दसऱयादिवशी या दौडची सांगता झाली. निर्बंध असले तरी शिवभक्तांचा उत्साह मात्र हजारोंच्या पटीत होता. शिवरायांचा नामघोष हा धारकऱयांना नवचेतना देणारा ठरला. त्यामुळे यावषीची ही दौड धारकऱयांच्या स्मरणात कायमची राहणार आहे.
नवव्या दिवशीच्या दौडला मारुती गल्ली येथील मारुती मंदिरापासून सुरुवात झाली. विभागप्रमुख चंद्रशेखर चौगुले यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. प्रेरणामंत्राने सुरुवात झाली. पहाटेच्या काळोखातून दुर्गामातेचा जागर करीत दौड पुढे पुढे जात होती. बसवाण गल्ली, रामलिंगखिंड गल्लीत ठिकठिकाणी महिलांनी दौडचे स्वागत केले. माजी महापौर सरिता पाटील यांनी सम्राट अशोक चौक येथे दौडचे स्वागत केले.
धर्मवीर संभाजी चौक येथे दौडची सांगता झाली. विभागप्रमुख किरण बडवाण्णाचे व चंद्रशेखर चौगुले यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. ध्येयमंत्राने यावषीच्या दौडची सांगता करण्यात आली. यावेळी शिवप्रति÷ानचे कार्यकर्ते, शिवभक्त उपस्थित होते.
सर्वांच्या सहकार्यामुळेच दौड निर्विघ्नपणे पार किरण गावडे (जिल्हाध्यक्ष, शिवप्रतिष्ठान)

कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे प्रशासनाने दौडवर अनेक निर्बंध घातले होते. दौडची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी मोजक्मया शिवभक्तांच्या उपस्थितीत नऊ दिवस दौड काढण्यात आली. समाजाबरोबरच प्रशासनानेही सहकार्य केल्यामुळेच दौड निर्विघ्नपणे पार पडली. त्यामुळे पोलीस प्रशासन व धारकऱयांचे त्यांनी आभार मानले.









