ऑनलाईन टीम / गोवा
गोवा विधानसभा रणधुमाळी आता सुरु झाली असुन राजकिय नेत्यांच्या ही फैरी झडत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आज गोवा विधानसभेच्या अनुशंगाने तीसरी यादी जाहीर करण्यात आली. यात ९ उमेदवारांची आता पर्यंत नावे जाहीर केली आहेत. यावेळी बोलताना खासदार राऊत यांनी भाजपचे दिवंगत नेते व गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना भाजपाकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. या मुद्यावरुन उत्पल पर्रिकरांच्याच बाबतीत घराणेशाही कशी आडवी आली ? असा खोचक सवाल उपस्थित करत भाजपवर ताश्चर्य ओढले आहे.
उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारल्यानंतर यावर बोलताना राऊत म्हणाले, तिकीट नाकारताना कोणाला तिकीट द्याव, हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांचा पक्ष आहे त्यांनी ठरवायचं कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला नाही द्यायचं. त्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणं किंवा मत व्यक्त करणं, हे योग्य नाही.
तसेच गोव्यातील आजची यादी पाहीली तर, वाळपई, पर्रे इथे घराणेशाहीच आहे. त्यानंतर पणजी, ताळीगाव ही घराणेशाहीच आहे. मग उत्पल पर्रिकर यांच्याबाबतीत घराणेशाही कशी आडवी आली?” असा सवाल खडा करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे भाजप याबद्दल काय प्रतिक्रिया देते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.