पोंगयांग
आपले वडील किम जोंग इल यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर कोरियामध्ये अकरा दिवसांचा कडक निर्बंधाचा अजब आदेश उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग यांनी नुकताच बजावला आहे. या आदेशाअंतर्गत लोकांना हसण्यासह शॉपिंगवरही बंदी लादली आहे. माध्यमांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारपासूनच 11 दिवसांचा शोक राष्ट्रीय स्तरावर पाळण्यास सुरुवात झाली आहे. या अंतर्गत सामान्य नागरिकांना हसण्यावर तसेच दारू पिण्यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर कोरियातील सिनुइजू शहरांमधील लोकांनी या संदर्भात रोष व्यक्त केला आहे. गरजेच्या वस्तू घेण्यासाठी बाहेर जाण्यासाठीही निर्बंध लादण्यात आले आहेत. जर कुणी नियमाचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर सरकारकडून कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे. अकरा दिवस देशामध्ये जोराने रडण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या दिवसात एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पश्चातील कुटुंबाला शांतपणे शोक व्यक्त करावा लागणार आहे.









