डॉ. कोडकणी सुपर स्पेशालिटी आय सेंटरचा 23 वा वर्धापन दिन उत्साहात
प्रतिनिधी/ बेळगाव
कोणतेही उपकरण सक्षम असले तरी ते हाताळणारा माणूस महत्त्वाचा आहे. डॉ. शिल्पा कोडकणी यांनी आपल्या आय सेंटरमध्ये उत्तर कर्नाटकातील एकमेव असे अँटेरियन हे आधुनिक मशीन आणले आहे. त्या स्वत: कुशल नेत्रतज्ञ असून या ठिकाणी रुग्णांना अत्यंत उत्तम सेवा मिळते. मुख्य म्हणजे त्या मोफत नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करतात, हे महत्त्वाचे असल्याचे मत आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केले.
अयोध्यानगर येथील डॉ. कोडकणी सुपर स्पेशालिटी आय सेंटरचा 23 वा वर्धापन दिन शनिवारी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने डॉ. शिल्पा यांनी अँटेरियन ही नवीन मशीन रुग्णसेवेत रुजू केली. त्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार बेनके बोलत होते. व्यासपीठावर उद्योजक रोहन जुवळी व वायव्य लॅबचे आर. के. पाटील तसेच राजेंद्र बेळगावकर उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. संजय पाच्छापुरे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक करताना डॉ. शिल्पा यांनी अँटेरियन मशीनचे कार्य व महत्त्व स्पष्ट केले. या मशीनमुळे आता अचूक शस्त्रक्रिया करण्याची क्षमता वाढणार आहे, असे त्या म्हणाल्या. यानंतर उत्कृष्ट कर्मचारी म्हणून संगीता व संजीवनी तसेच महिन्यातील उत्कृष्ट कर्मचारी म्हणून श्ा़dरुती यांचा सत्कार करण्यात आला. नियमित तपासणी करून घेणारे मल्लाप्पा गोडकांडे, महादेवी मठपती, दीपक कलाल, अरुण काळवैभव, मेजर शेळके, संदीप वनमाळी यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी आर. के. पाटील यांनी अद्ययावत उपकरणे भारतातही तयार व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. रोहन जुवळी यांनीही शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन शीतल जाधव यांनी केले. वनमाळी यांनी आभार मानले.
चौकट करणे नेत्ररुग्णांना उत्तम उपचार मिळावेत, मोतीबिंदू व डोळ्याशी संबंधित अन्य शस्त्रक्रिया सुलभ होण्याच्यादृष्टीने कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान वापरून अँटेरियन हे मशीन रुजू केले आहे.
`









