ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात मागील 24 तासात 223 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 05 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे प्रदेशातील एकूण संख्या 93,621 इतकी आहे. सद्य स्थितीत 3,310 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल 10,358 नमुने निगेटिव्ह आले. तर देहरादून मध्ये सर्वात जास्त म्हणजेच 82 नवे रुग्ण आढळून आले. अल्मोडा 48, बागेश्वर 02, चमोली 5, चंपावत 17 हरिद्वार 23, नैनिताल 25, पौडी गडवाल 09, पिथौरागड 3, रुद्रप्रयाग 01, टिहरी 4, उधमसिंह नगर 20 आणि उत्तरकाशीमध्ये 1 नव्या रुग्णांची भर पडली.
दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 1573 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर कालच्या दिवसात 303 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आता पर्यंत 87,673 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.









