काँग्रेसच्या शासनकाळातील गोळीबाराची करून दिली आठवण
वृत्तसंस्था/ देहरादून
केंद्रीय गृह तसेच सहकारमंत्री अमित शाह यांनी शनिवारी देहरादून येथे ‘घसियारी कल्याण योजने’चा शुभारंभ केला आहे. यावेळी आयोजित सभेत बोलताना शाह यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. देवभूमीला स्वतंत्र्य राज्याचा दर्जा देण्याचे काम माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते. राज्याची मागणी करताना कित्येक युवा हुतात्मा झाले होते. उत्तराखंडच्या युवांच्या या मागणीला भाजपने बळ दिले होते, पण तेव्हा उत्तराखंडच्या युवांवर गोळी कुणी झाडल्या होत्या हे आठवा असे म्हणत शाह यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजपचे पूर्ण बहुमतातील सरकार येणार आहे. काँग्रेसचे नेते निवडणूक येताच नवे कपडे शिवून घेतात. काँग्रेस कधीच लोककल्याणाचे काम करू शकत नाही. काँग्रेस हा आश्वासने न पाळणारा पक्ष असल्याची टीका गृहमंत्र्यांनी केली आहे.
राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर असताना मी येथे आलो होतो, तेव्हा माझ्या वाहनांचा ताफा थांबला होता, त्यानंतर मला काही लोकांनी माझी भेट घेत शुक्रवारी महामार्ग रोखण्याची आणि तेथे नमाज पठण करण्याची अनुमती असल्याचे सांगितले होते. अशाप्रकारचे तुष्टीकरणाचे राजकारण करणारा काँग्रेस पक्ष देवभूमीचा विकास करू शकत नसल्याचे शाह म्हणाले.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातच गरीबांचे कल्याण होईल. उत्तराखंडमध्ये ‘मुख्यमंत्री घसियारी कल्याण योजनेचा शुभारंभ झाला आहे. राज्यातील 2 हजार शेतकरी मक्याचे पिक घेतील आणि वैज्ञानिक पद्धतीने पौष्टिक पशू आहार तयार करणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
सहकाराची चळवळ काँग्रेसच्या काळात कमकुवत करण्यात आली होती. पण पंतप्रधान मोदींनी स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून सहकाराशी संबंधित देशातील कोटय़वधी शेतकरी, महिला, मजुरांच्या कल्याणासाठी मोठे काम केले आहे. कोरोनाशी संबंधित लसीचा पहिला डोस पूर्ण लोकसंख्येला देणाऱया राज्यांमध्ये उत्तराखंडचा समावेश असल्याचे उद्गार गृहमंत्र्यांनी काढले आहेत.
चारधाम यात्रा
पंतप्रधान मोदी 5 नोव्हेंबर रोजी केदारनाथ धाममध्ये भगवान आदि शंकराचार्य यांच्या भव्य मूर्तीचे अनावरण करणार आहेत. तसेच देशभरातील शिवालयांना जोडले जात आहे. पेदारनाथची पुनउ&भारणी पूर्ण होणार आहे. चारधाम यात्रेसाठी ऑल वेदर रोडचे कामही पूर्णत्वास पोहोचल्याचे शाह यांनी म्हटले आहे.









