वार्ताहर/ उचगाव
उचगाव येथील अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचलित मळेकरणी हायस्कूलमध्ये महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती समारंभ पार पडला.
प्रारंभी हायस्कूलचे मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले तर व्ही. एम. देसाई, प्रविणा देसाई, शितल कंग्राळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रतिक्षा भट, जी. के. तुप्पट, महेश उचगावकर, शिक्षकवर्ग उपस्थित होता.
उपस्थितांचे स्वागत व्ही. एम. देसाई यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रतिक्षा भट यांनी केले.









