प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर विभागातील बाजार समितीच्या सचिवांची कामकाज आढावा बैठक कोल्हापूर विभागाचे विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांचे अध्यक्षतेखालील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी पार पडली. ई-नामच्या अमलबजावणीच्या दिरंगाईवर वाडेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत सचिवांची चांगलीच खरडपट्टी केली. ई लिलाव अणि ई पेमेंट तातडीने चालू करण्या सक्त सुचना देण्यात आल्या. तर टाळाटाळ केल्यास कडक कारवाई करु असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत सुरू असलेल्या गोदाम अणि धान्य चाळणी प्रकल्पाचा आढावा घेऊन वेळेत कामे पूर्ण करण्यात यावीत, यासाठी प्रयत्न करावा आसे नमूद केले. तसेच बाजार समित्यांनी कामकाज करताना शेतकरी केंद्र स्थानी ठेऊन कामकाज करावे.
शेतकऱयांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे आसे सूचित केले. शेतकऱयांच्या हितासाठी प्रत्येक बाजार समिती ने पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना राबवावी असे सांगितले. केंद्र सरकारच्या किसानरथ, आत्मनिर्भर योजनेमध्ये नोंदणी करून बाजार समितीने प्रसार करणे आवश्यक आहे. आसे नमूद केले. बाजार समित्यांच्या लेखा परीक्षणबाबत आढावा घेऊन वेळेत लेखा परीक्षण करून घेणे बाबत सूचित केले.
बैठकीस कराडचे उपनिबंधक मनोहर माळी, पणनचे कोल्हापूर विभागाचे उप सरव्यवस्थापक सुभाष घुले, सहायक निबंधक श्रीमती राजमाने, पणनचे भोसले, भुजबळ अणि कोल्हापूर विभागातील सर्व बाजार समित्यांचे सचिव उपस्थितीत होते.
Previous Articleपेठनाका येथे ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक
Next Article पन्हाळा तालुक्यातील पोखलेत तरुणाची आत्महत्या









