नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अबकारी घोटाळ्याप्रकरणी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली आहे. केजरीवालांनी याकरता ईडीला 12 मार्चनंतरची तारीख निश्चित करण्यास सांगितले आहे. या चौकशीला आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे आठव्या समन्सनंतरही केजरीवाल हे सोमवारी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत.









