इस्रायलने ओमिक्रॉन फैलावण्यावर चिंता व्यक्त करत अमेरिका, कॅनडा आणि जर्मनीसह 10 देशांच्या प्रवासावर बंदी घातली आहे. देशात ओमिक्रॉनचे 175 रुग्ण सापडले आहेत. मियामी येथून आलेल्या विमानात 17 प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. इस्रायल कोरोनाच्या पाचव्या लाटेला तोंड देत असून ओमिक्रॉनमध्ये हा संसर्ग वेगाने फैलावला असल्याचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी म्हटले आहे.
कमी गंभीर असल्याचा पुरावा नाही
ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका अध्ययनानुसार कोरोना विषाणूचे ओमिक्रॉन स्वरुप हे डेल्टाच्या तुलनेत कमी भयावह असल्याचा कुठलाच पुरावा नाही. ओमिक्रॉन मागील संक्रमण किंवा लसीच्या दोन्ही डोसमुळे मिळालेल्या प्रतिरक्षणाला मोठय़ा प्रमाणावर चकवा देत असल्याचे अध्ययनात आढळून आले आहे.









