मागील महिन्यात झाली होती नियुक्तीची घोषणा
नवी दिल्ली
तुर्किश एअरलाईन्सच्या संचालक मंडळाचे माजी अध्यक्ष इल्कर आयसी हे एअर इंडियाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ बनणार नाहीत. इल्कर हे टाटा सन्सकडे यासंदर्भात भेटले आणि त्यांनी वरील पदावर नियुक्ती होण्यास नकार दिल्याची माहिती आहे.
साधारणपणे आयसी यांची नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांमध्येच भारतामध्ये त्यांना मोठय़ा प्रमाणात विरोध दर्शवण्यात आला होता. टाटाकडून 14 फेब्रुवारी रोजी इल्कर यांची एअर इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओपदी घोषणा करण्यात आली होती.
नियुक्तीनंतर माध्यमात टार्गेट
आयसी यांचे पाकिस्तान कनेक्शन समोर आल्यानंतर सरकारने त्यांच्या नियुक्तीवर शंका व्यक्त केली होती. यानंतर इल्कर यांनी पद न स्विकारण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. यामुळे आता या पदावर नवीन व्यक्ती विराजमान होण्याची शक्यता आहे.









