ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी चीनची कोरोना लस घेतली होती. इम्रान यांचे स्वीय सहायक फैजल सुलतान यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
सुलतान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,
पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या होम आयसोलेशनमध्ये असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी सायनोफार्म या चिनी लसीचा डोस घेतला होता. मात्र, ही लस घेतल्यानंतरही ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले.