मुंबई
दिग्गज आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसने जूनअखेरच्या तिमाहीमध्ये 3 टक्के वाढीसह 5 हजार 362 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला असल्याची माहिती आहे. देशातील ही दुसऱया क्रमांकाची मोठी आयटी सेवा देणारी कंपनी असून जूनअखेरच्या तिमाहीत कंपनीचा महसूल 23 टक्के इतका वाढत 34 हजार 470 कोटी रुपयांवर पोहचला आहे.









