प्रतिनिधी/ बेळगाव
इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या अध्यक्षपदी शर्मिला कोरे आणि सचिव म्हणून मंजिरी पाटील यांची निवड झाली आहे. त्यांचा अधिकारग्रहण समारंभ लवकरच होणार आहे. दरम्यान क्लबच्या नूतन कार्यकारिणीने काही उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून इनरव्हील क्लब ऑफ बेळगावने राजहंसगड येथे 500 रोपांची लागवड केली.
इनरव्हील असोसिएशनच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार इनरव्हील मिनी फॉरेस्ट निर्माण करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. राजहंसगड येथे क्लबच्या सदस्या सुरेखा देशपांडे यांची जमीन आहे. याठिकाणी सदस्यांनी 500 रोपे लावली. यावेळी क्लबच्या माजी चेअरमन लता कित्तूर, अध्यक्षा शर्मिला कोरे, सचिव मंजिरी पाटील आणि इव्हेंट चेअरमन सुरेखा देशपांडे उपस्थित होत्या.









