प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावमधील इनरव्हील क्लबतर्फे ज्ञान प्रबोधन मंदिर या आयसीएसई विद्यालयात 2019-20 या वर्षात दृष्टी व स्पर्शसारखे अतिशय महत्त्वाचे उपक्रम राबविण्यात आले. इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱयांनी शाळेत होणाऱया उपक्रमात आपला अमूल्य सहभाग दर्शविला व सदिच्छा भेट दिली.
क्लबच्या अध्यक्षा स्वाती उपाध्ये, सचिव शालिनी चौगुले यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता उपयोगी मोठी सतरंजी भेट दिली. शाळेत होणाऱया सांस्कृतिक कार्यक्रमांविषयी, त्यातील विद्यार्थ्यांच्या सहभागाविषयी त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.









