वृत्तसंस्था/ मिलान
इटलीचा टेनिसपटू फॅबिओ फॉगनेनी याच्या दोन्ही घोटय़ांना दुखापत झाली होती. सध्या कोरोना महामारी संकटामुळे टेनिस क्षेत्राला विश्रांती मिळाल्याने फॉगनेनीने दुखापत झालेल्या दोन्ही घोटय़ावर शस्त्रक्रिया करवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी उशिरा आपण येथील एका खासगी रूग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल होणार असल्याचे फॉगनेनीने सांगितले.
एटीपीच्या मानांकनात 11 व्या स्थानावरील फॉगनेनीने गेल्यावर्षी माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्याला या दुखापतीमुळे टेनिसपासून अलिप्त रहावे लागले होते.









