प्रतिनिधी / इचलकरंजी
बंदी असलेला पानमसाला, तंबाखुजन्य पदार्थाचासाठा केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी सरस्वती मार्केटमधील व्यापार्यास अटक केली. राज गुलाब तनवानी (वय 40, रा. गांधी कॅम्प) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 4 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राज तनवाणी याचा सरस्वती मार्केटमध्ये सुरज कन्फेक्शनरी नावाचे किराणा दुकान आहे. या ठिकाणी तंबाखुजन्य पदार्थ ठेवल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कुडवे यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार छापा टाकून तपासणी केली असता या ठिकाणी 1560 रुपयांचा पानमसाल्याची 26 पाकीटे, 630 रुपयांची सुगंधी पत्ती पाकीटे, 1080 रुपयांचे केशरयुक्त विमल पानमसाला यासह तंबाखुची पाकीटे, पानमसाला व सुगंधी तंबाखु असा 4620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी राज तनवाणी याला अटक करण्यात आली आहे.