वृत्तसंस्था/ केपटाऊन
सध्या इंग्लंडचा क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर आहे. दरम्यान इंग्लंड संघातील दोन खेळाडूंची शेवटच्या फेरीतील कोरोना चांचणी घेण्यात आली होती. तेही निगेटिव्ह असल्याचे निश्चित झाल्याने त्यांना पुढील सरावासाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून परवानगी देण्यात आल्याची माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने मंगळवारी दिली.
दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर आलेल्या इंग्लंड संघातील दोन खेळाडूंची कोरोना चांचणी स्वतंत्रपणे घेण्यात आली होती. या चांचणीत ते पॉझिटिव्ह असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले नाही. त्यानंतर या कोरोना चांचणीबाबत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने क्रिकेट दक्षिण आफ्रिकेशी संपर्क साधला. इंग्लंडचा संघ सध्या केपटाऊनमध्ये वास्तव्य करीत आहे. उभय संघातील तीन सामन्यांची वनडे मालिका कोरोना महामारी समस्येमुळे लांबणीवर टाकली असल्याने आता इंग्लंडचा संघ गुरूवारी लंडनला प्रयाण करेल.









