प्रतिनिधी / वाई :
वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, स्मशानभूमी शेड, स्मशानभूमी सुशोभिकरण इत्यादी कामांसाठी जिल्हा नियोजन आराखडा अंतर्गत ग्रामपंचायत जनसुविधा, मोठय़ा ग्रामपंचायतींना नागरीसुविधा ‘क’ वर्ग यात्रास्थळ योजनेअंतर्गत 2 कोटी 23 लाख रुपयांची कामे मंजूर झाली आहेत, अशी माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
वाई तालुका : परतवडी येथे ग्रामपंचायत कार्यालय 10 लाख रुपये, चिंधवली येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधणे 10 लाख, गोवेदिगर येथील स्मशानभूमी सुधारणा 4 लाख, जांब येथील स्मशानभूमी सुशोभिकरण 4 लाख, न्हाळेवाडी येथे स्मशानभूमी शेड 4 लाख, वडवली येथे स्मशानभूमी शेड बांधणे, 3 लाख, भोगांव येथील स्मशानभुमीजवळ प्रतिक्षालय बांधणे 4 लाख, शेंदुरजणे स्म्शानभुमीकडे जाणारा रस्ता सुधारणा 4 लाख, वहागांव येथे स्मशानभुमीजवळ प्रतिक्षालय बांधणे 3 लाख, पिराचीवाडी (गुंडेवाडी) येथे स्मशानभूमी शेड बांधणे 4 लाख, पिराचीवाडी (धावडी) येथे स्मशानभूमी शेड बांधणे 5 लाख, वेळे स्मशानभूमी सुधारणा करणे 4 लाख, कोचळेवाडी(गुळुंब) येथे स्मशानभूमी सुधारणा 3 लाख, बावधन येथील मंदिर परिसर रस्ता काँक्रिटीकरण करणे 7 लाख, ओझर्डे येथील मंदिर परिसर रस्ता काँक्रिटीकरण करणे 4 लाख, भुईंज बदेवाडी येथील अंतर्गत रस्ता करणे 5 लाख, परसरणी येथील बुवासाहेब मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे 10 लाख, बावधन येथील मारूती मंदिर ते शिवाजी चौक रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 10 लाख, ओझर्डे येथील स्मशानभूमी सुशोभिकरण करणे 10 लाख, यशवंतनगर येथील अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 10 लाख.
खंडाळा तालुका : धनगरवाडी येथे स्म्शानभूमी शेड 4 लाख, बावडा येथील मळाईदेवीकडे जाणारा रस्ता सुधारणा 4 लाख, दापकेघर येथे स्मशानभूमी शेड बांधणे 4 लाख, अंदोरी येथील ननावरे मळा स्मशानभुमीकडे जाणारा रस्ता सुधारणा 3 लाख, बावकलवाडी येथे स्म्शानभूमी शेड 4 लाख, भाटगर येथे स्मशानभूमी प्रतिक्षालय 4 लाख, खेड स्मशानभूमी शेड, रस्ता 4 लाख, शिरवळ येथील अंबिका माता मंदिर रंगरंगोटी व सुशोभिकरण करणे 12 लाख, वडगांव येथील मंदिरासमोर रस्ता काँक्रिटीकरण करणे व मंदिर परिसर सुशोभिकरण करणे 5 लाख, विंग येथील सीतामाईवस्ती सुधारणा करणे 4 लाख, शिरवळ (ता.खंडाळा) येथील केदारेश्वर तारांगण येथील रस्ता काँक्रिटीकरण करणे 10 लाख.
महाबळेश्वर तालुका : भिलार येथील जननीमाता मंदिराकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लाख, राजपुरी येथील कार्तीकस्वामी मंदिर परिसर सुशोभिकरण करणे 5 लाख, आचली येथे खुला सभामंडप बांधणे व सुशोभिकरण करणे 5 लाख, भिलार येथे रस्ता काँक्रिटीकरण करणे 3 लाख, धनगरवाडी अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे 4 लाख, कुमठे येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे 3 लाख, धारदेव येथील अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 3 लाख, मेटगुताड येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे 4 लाख, खिंगर येथील स्मशानभूमीकडे जाणाऱया रस्त्यालगत संरक्षक बांधणे 4 लाख, पारसौंड येथे स्मशानभूमी शेड बांधणे 4 लाख, बिरवाडी येथे स्मशानभूमी शेड बांधणे 4 लाख, पाली येथील वाघिरा रस्ता सुधारणा करणे 3 लाख अशा प्रकारे विविध कामांसाठी निधी मंजूर झालेला आहे.









