तंदुरुस्ती, निरोगी जीवनशैली याबाबत आता जागरूकता निर्माण झाली आहे. विविध डाएट ट्रेंड्सही आले आहेत. फिट राहण्यासाठी व्यायामासोबतच पोषक आहारही घ्यावा लागतो. याबाबतीत आहारतज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. मात्र आजारतज्ञही डाएटबाबत काही चुकीचे ग्रह बाळगून असतात. तुम्हीही आहारतज्ञांकडे जाण्याच्या विचारात असाल तर त्याआधी हे वाचा…
* हाय प्रोटीन डाएट- बरेच आहारतज्ञ उच्च प्रथिनयुक्त आहार शरीरासाठी घातक असल्याचं मानतात पण हे खरं नाही. प्रथिनं आणि कॅल्शियम यांच्या एकत्रिकरणाने चयापचय क्रिया सुधारते.
* लो फॅट फूड- लो फॅट फूड शरीरात अतिरिक्त फॅट साचू देत नाही, असा एक गैरसमज आहे. पण लो फॅट फूडमध्ये कृत्रिम गोडव्याद्वारे चवीचं संतुलन केलं जातं. त्यामुळे आरोग्यावर दीर्घकालीन वाईट परिणाम होण्याची शक्यता वाढते.
* लो फॅट आणि कर्बोदकं – आहारतज्ञांच्या मते लो फॅट आणि कर्बोदकयुक्त पदार्थांचं सेवन बंद केल्यास वजन नियंत्रित राहतं पण, या घटकांचं सेवन पूर्णपणे बंद केल्यास शरीरातल्या कर्बोदकांचं प्रमाण कमी होऊन आरोग्यविषयक गंभीर समस्या उद्भवू शकतात. * अंडी हे अनारोग्याचं कारण- काही आहारतज्ञांच्या मते अंडं आरोग्याच्या दृष्टीने घातक असतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. पण ही वस्तूस्थिती नाही. अंडय़ामुळे चांगल्या कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होत असल्याने त्याचं सेवन लाभदायी ठरतं.









