ऑनलाईन टीम / दिसपूर :
आसाममधील सरकारी मदरसे आणि संस्कृत शाळा नोव्हेंबर महिन्यापासून बंद करण्यात येणार आहेत. लवकरच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करणार असल्याचे आसामचे शिक्षण आणि अर्थमंत्री हिमांता बिस्व सरमा यांनी सांगितले.
सरमा म्हणाले, आसाममध्ये खासगी तत्वावर मदरसे आणि संस्कृत शाळा चालवण्यासाठी सरकारचे काहीही म्हणणे नाही. धार्मिक शास्त्र शिकवण्यासाठी सरकार सार्वजनिक पैशाचा वापर करू शकत नाही. त्यामुळे भाजप सरकार पुढील महिन्यापासून सरकारी मदरसे आणि संस्कृत शाळा बंद करण्याचा विचार करत आहे.
सरकारी मदरसे आणि शाळा बंद करून तेथील 48 कंत्राटी शिक्षकांना शिक्षण विभागाच्या शाळांमध्ये सामावून घेतले जाऊ शकते, असेही सरमा म्हणाले.









