मुख्यमंत्री सोनोवाल यांनी मानले आभार
वृत्तसंस्था/ दिसपूर
बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता अक्षय कुमारने आसाममधील पूरग्रस्तांसाठी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मंगळवारी ट्विट करत अक्षय कुमारचे आभार मानले आहेत. आसाममधील संकटाच्या काळात अक्षय कुमार यांनी नेहमीच सहानुभूती दाखविली असून मदतही केल्याचे मुख्यमंत्री सोनोवाल यांनी म्हटले आहे.
जुलै महिन्यात राज्यातील 33 पैकी 33 जिल्हय़ांना पुराचा फटका बसला होता. पुरामुळे सुमारे 28 लाख लोक प्रभावित झाले होते. राज्यातील हजारो घरांची हानी झाली असून पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत.









