ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर यांनी केलेल्या अभ्यासात कॅन्सरमध्ये आनुवंशिक, पर्यावरण आणि जीवनशैली महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट झाले असुन, हवा प्रदुषणात अग्रेसर आशिया खंडातील महिलांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग 25 टक्के आणि पुरुषांमध्ये 24 टक्क्यांनी वाढला असल्याची धक्कादायक माहिती या अभ्यासात समोर आली आहे. कॅन्सरमध्ये आनुवंशिक, पर्यावरण आणि जीवनशैली महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच फुफ्फुसाचा स्क्वॅमस सेल कार्सिनोमा बहुतेकदा धूम्रपानामुळे होत असल्याचे या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. याचबरोबर पृथ्वीच्या वातावरणात ०.१ मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर काळ्या कार्बनची वाढ झाली आहे. काजळीमुळे एडेनोकार्सिनोमा चे प्रमाण जगभरात 12% वाढले आहे.
आरोग्य आणि जीवशास्त्राचे प्राध्यापक जोसेफ सुंग यांनी एका इंग्रजी प्रसार माध्यमाशी बोलताना जगभरातील फुफ्फुसांच्या एडेनोकार्सिनोमामध्ये वाढ हवेच्या प्रदूषणामुळे होऊ शकते. असे ते म्हणाले. तसेच जगभरात महिला आणि धूम्रपान न करणाऱ्यांना फुफ्फुसाचा कर्करोग कसा होतो. हे गेल्या दशकांमध्ये नेहमीच स्पष्ट झालेले नाही.”फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या आमच्या अभ्यासामध्ये विशिष्ट प्रकारच्या कारणांमध्ये पर्यावरणीय घटकांचे महत्त्व देखील समाविष्ट आहे,” ते म्हणाले.
एनटीयूच्या एशियन स्कूल ऑफ द एन्व्हायर्नमेंटचे सहयोगी प्राध्यापक स्टीव्ह यिम, प्रमुख संशोधक म्हणाले: “धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या संख्येत घट होत असतानाही, फुफ्फुसाच्या एडेनोकार्सिनोमाच्या वाढत्या प्रवृत्तीमागील कारणाविषयी आमचा अभ्यास आम्हाला एक संकेत देतो. “आमचे निष्कर्ष हवेतील प्रदूषक उत्सर्जन, विशेषतः काळा कार्बन कमी करण्याच्या गरजेवर भर देतात,” असे ही ते म्हणाले. यामुळे पुन्हा एकदा प्रदुषणाच्या निमित्ताने मानवी जीवनावर होणारे अनिष्ट परिणाम समोर आले आहेत.