वेंगुर्ले पंचायत समिती सभेत एकमताने ठराव
वार्ताहर / वेंगुर्ले:
आशा आणि अंगणवाडी सेविकांना विमा कवच तसेच मानधनात वाढ करण्यासंदर्भात माजी सभापती तथा पं. स. सदस्य यशवंत परब यांनी मांडलेला ठराव सभागृहाने सर्वांनुमते मंजूर केला. तसेच शेतकऱयांना खतेसुद्धा 50 टक्के अनुदानावर देण्यात यावी, अशी मागणीही करण्यांत आली.
वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा शुक्रवारी सभापती अनुश्री कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली पं. स.च्या बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी उपसभापती सिद्धेश परब, माजी सभापती तथा पं. स. सदस्य यशवंत परब, सुनील मोरजकर, श्यामसुंदर पेडणेकर, गौरवी मडवळ, प्रणाली बंगे आदी पं. स. सदस्य, गटविकास अधिकारी उमा पाटील-घारगे व अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला सभापती अनुश्री कांबळी यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्मयातील सर्व गावातील ग्रामस्तरीय नियंत्रण समिती, तालुक्मयातील आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, ग्राम प्रशासनातील सर्व यंत्रणा अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहेत. विशेषता मानधन तत्वावर कार्यरत असणाऱया तालुक्मयातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे काम चांगल्या प्रकारे सुरू असून ते आज स्वत:चा जीव धोक्मयात घालून प्रत्येक घराघरात पोहचत आहेत. तालुक्मयात 1 फेब्रुवारी रोजी आशा दिवस साजरा करण्यात आला होता. त्यादिवशी तालुक्मयातील आशांना आपण कोरोना विषाणू प्रतिबंधत्मक उपाययोजना तसेच जनजागृतीबाबत आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत त्या दिवसापासून तालुक्मयातील सर्व आशा स्वयंसेविकांनी आपापल्या भागात सुरू केलेले काम आजपर्यंत अविरत सुरू आहे. याबद्दल आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि सर्व विभागांचे सभापतींनी विशेष अभिनंदन केले. तसेच तालुक्मयातील सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या पार्श्वभूमीवर तालुक्मयातील सर्व यंत्रणांनी आपले काम सुरक्षितता सांभाळत आणखी चांगल्या प्रकारे करावे. असे आवाहन केले.
येत्या महिनाभरात पावसाळा सुरू होणार असून त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने विद्युतभार वाहन करणाऱया तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या बाजूला कराव्यात. पावसाळय़ात अशा कारणांमुळे विद्युत तारा तुटणार नाहीत. मनुष्य किंवा वित्तहानी होणार नाही. याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश वीज वितरण अधिकाऱयांना दिले.
माजी सभापती तथा पं. स. सदस्य यशवंत परब यांनी आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांना विमा कवच तसेच मानधनात वाढ करण्यासंदर्भात ठराव मांडला व तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच शेतकऱयांना खते 50 टक्के अनुदानावर देण्यात यावी, अशी सूचना मांडली.
म्हापण ग्रामसेवकांच्या चौकशीचे आदेश
म्हापण मतदार संघाच्या पं. स. सदस्या गौरवी मडवळ यांनी म्हापण ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक चव्हाण हे आपल्या कार्यक्षेत्रात राहत नाहीत. ग्रामपंचायती मध्ये आलेल्या नागरिकांना सहकार्य करीत नाहीत. तसेच नागरिकांच्या कामाबाबत अडवणूक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. गावातील लोकांच्या ग्रामसेवकांविषयी अनेक तक्रारी आहेत. त्या ग्रामसेवकाच्या बाबतीत आपण यापूर्वी वारंवार अनेक सभांमधून आवाज उठविला होता. तरीही त्यांच्या कार्यपद्धतीत बदल झालेला दिसत नाही. तरी सदर ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी या सभेत केली. यावर सदरप्रकरणी सखोल चौकशी करावी संबधित ग्रामसेवक त्यात दोषी आढळल्यास अगर कामकाजात अनियमितता आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश सभापती अनुश्री कांबळी यांनी गटविकास अधिकारी यांना दिले.
पाणी पुरवठय़ाची कामे तात्काळ पूर्ण करा!
माजी सभापती तथा पं. स. सदस्य सुनील मोरजकर यांनी ग्रामसंघामार्फत गावांमध्ये बी-बीयाणे वितरीत होणार आहेत. बचत गटांकडून तशी माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सदर बियाणे चांगल्या प्रतीचे आहे किंवा कसे आहे. याबाबतची खात्री संबधित यंत्रणेने करावी, अशी सूचना केली तसेच पाणी पुरवठा योजनांची कामे तात्काळ पूर्ण करण्याची सूचना केली. तालुक्मयात विविध विकासकामे सुरू आहेत. त्यांना मुदतवाढ देण्याचा ठराव ही या सभेत सर्वांनुमते घेण्यात आला तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला.









